मोठी बातमी! येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार!
मुंबई - कोरोनामुळे मागच्या बऱ्याच महिन्यापासून बंद असलेल्या महाराष्ट्रातील शाळा आता सुरु होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होतील. शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजुर झाला आहे.
मा.मुख्यमंत्री महोदयाांनी राज्यातील कोव्हीड परिस्थितीच्या आढावा घेऊन लॉकडाऊनच्या अनुषंगाने शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत टास्क फोर्स नियुक्त करण्यात आलेला आहे. सदर टास्क फोर्ससोबत दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या चर्चेच्या वेळी टास्क फोर्सने शाळा सुरु करण्यासंदर्भात काही शिफारशी / सूचना केल्या आहेत.
मध्यंतरी ग्रामाीण भागातील शाळा सुरु झाल्या होत्या. पण कोरोनाची दुसरी लाट आली व शाळा पुन्हा बंद झाल्या. मागच्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही इयत्ता, वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद करावे लागले. विद्यार्थी मागच्या दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. १७ ऑगस्टला शाळा सुरु करण्याचा विचार होता. पण तो निर्णय रद्द झाला. बहुतांश ठिकाणी शिक्षकांचे व नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शिक्षण खात्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्या भागातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार असेल.
शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे
0 टिप्पण्या