Subscribe Us

या जिल्ह्यांना गुलाब चक्रीवादळामुळे रेडअलर्ट !

या जिल्ह्यांना गुलाब चक्रीवादळामुळे रेडअलर्ट !


राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता लॅण्डफॉल झाल्यानंतर कमी झाली आहे. मात्र, याचा परिणाम महाराष्ट्रात काही ठिकाणी दिसणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे, आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज २८ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासह रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्याना रेड अलर्ट ?

जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या