जि.प.शाळा बेटावद बु येथे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न
बेटावद बु ता.जामनेर जि.जळगाव येथे नुकताच राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प.शाळा बेटावद बु शाळेचे मुख्याध्यापक शांताराम सपकाळ हे होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख नवल राजपूत यांनी केले. पोषण आहार सप्ताह व त्याची आवश्यकता या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दिलीप गरुड यांनी स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व सांगितले. नीना सोनवणे यांनी सशक्त भारत घडविण्यासाठी बालक व विद्यार्थी यांचे योग्य पोषण असणे किती महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका विमलबाई लंके, सुवर्णा भोयटे, बबिता सुरवाडे, संगीता धनगर मदतनीस इंदूबाई अनफाट, नर्मदा मिसाळ, रेखा गाढे, अर्चना चिपोळे यांनी वेगवेगळे पोषक अन्नघटक असलेले पदार्थ बनवून आणलेले होते त्यांची सुंदर सजावट व मांडणी रंजना इंगळे यांच्या मदतीने केलेली होती. या अभियानाबाबत ग.शि.अ.सरोदे साहेब, शापोआअधिक्षक विष्णू काळे, विस्तारअधिकारी दुसाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुगलकिशोर ढाकरे व आभार प्रदर्शन रविंद्र पाटील यांनी केले.
0 टिप्पण्या