Subscribe Us

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय आभासी रन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय आभासी रन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन


जळगाव:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि ऑलिम्पिक जागरण समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय आभासी रन तथा ऑलिंपिक जागरण चळवळ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत दिनांक २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर, २०२१ या कालावधीत केव्हाही स्पर्धक सहभाग नोंदवू शकतात, या उपक्रमात धावणे या बाबीचा समावेश केलेला आहे. स्पर्धक आभासी पध्दतीने धावून या स्पर्धत सहभागी होवू शकतात, धावण्यासाठी स्पर्धक आपल्या आवडीच्या मार्गाची निवड करु शकतात, आपले धावणे पूर्ण केल्यानंतर त्याची नोंद घेण्यासाठी Googal Fit, Strava, यासारखे कोणत्याही फिटनेस अॅपचा वापर करावा, आपल्या मोबाईलवरील अॅपच्या नोंदणीचा स्क्रीनशॉट काढावा, त्यानंतर सर्व माहिती स्क्रीनशॉटसह दिलेल्या लिंकवर क्लिक करावी. आपली वैयक्तीक माहिती भरुन उपक्रमात सहभागी होवून स्पर्धकाने सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. समितीची लिंक:- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScef4wrdDIWXnPxRahhwD8eOgMriL7b25xp8nvzhAalkik-A/viewform?sf-link

इंडियाची लिंक:- https://fitindia.gov.in/freedom.run-2.0 या दोन्ही लिंकवर आपली माहिती भरावयाची असुन दोन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/ महाविद्यालय /नागरीक / खेळाडू/ संघटनेचे पदाधिकारी/ खेळाडू यांनी government of India कोविंड संदर्भात सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन स्पर्धेत सहभागी व्हावे, तसेच आपल्या परीसरातील, कुटूंबातील, शाळेतील व संघटनेतील पदाधिकारी, खेळाडू व पालक यांनाही यात सहभागी करुन घ्यावे. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. काही अडचण आल्यास अधिक माहितीकरीता सतिष वाघ, मो.नं. ९५४५०९०००६ वर संपर्क साधावा, असेही दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या