Subscribe Us

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संयुक्त राष्ट्र महासभा भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संयुक्त राष्ट्र महासभा भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र महासभेतील ७६ व्या सत्रामध्ये सहभागी झाले. त्यांनी जवळपास २५ मिनिटे हिंदीतून संबोधन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून होते. पंतप्रधान मोदी अफगाणिस्तान प्रश्न, कोरोना महासाथ या साऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलले ते थोडक्यात...

मी चहावाल्याचा मुलगा...

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात आपली ओळख करवून देत केली, त्यांनी म्हटले की एक लहान मुलगा जो रेल्वे स्टेशनवर चहा विकायचा तो आता भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्रसभेसमोर भाषण करतो आहे. स्वत:ची ओळख अधोरेखित करत त्यांनी म्हटले की, गेल्या तीन टर्म मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि आता पंतप्रधान म्हणून देशवासीयांची सेवा करताना मला एकूण 20 वर्षे होत आहेत. मी माझ्या अनुभवावरुन सांगतो, हो! लोकशाही साकारली जाऊ शकते.

विविधता हेच भारताचे सामर्थ्य

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग एका महामारीशी लढा देत आहे. मी त्या सर्वांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. मी त्या देशाचं प्रतिनिधीत्व करतो ज्या देशात 'मदर ऑफ डेमोक्रसी' म्हणून ओळखले जाते. यावर्षीच भारताने आपल्या 75 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. आमची विविधता हेच आमचे सामर्थ्य आहे. इथे वेगवेगळ्या भाषा, जातीधर्म आहे. हे भारताच्या लोकशाहीची ताकद आहे.

भारत विकासाच्या दिशेने

आज भारत विकासाच्या वाटेने निघाला आहे. गेल्या सात वर्षांमध्ये 43 कोटी नागरिकांहून अधिकांना बँक व्यवस्थेशी जोडून घेतले आहे. 36 कोटीहून अधिक लोकांना विमा कवच मिळाले. 50 कोटींहून अधिक नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या आहेत. 3 कोटी कोटी पक्के घर बनवून बेघर लोकांना घर दिले आहे. आज जगातील प्रत्येक सहावा नागरिक हा भारतीय आहे. त्यामुळे भारताचा विकास होताना जगाचाही विकास होतो आहे. भारत अमृतमहोत्सवी वर्षांत 75 उपग्रहांना अंतराळात पाठवणार जे मुलांनी तयार केलेले असेल.

जगासमोर अतिरेकी विचारसरणीचा धोका

आज जगासमोर अतिरेकी विचारसरणीचा धोका आहे. जगाला सध्या विज्ञानाधारित विवेकी विचारसरणीची जगाला आवश्यकता आहे. त्यामुळेच भारत अनुभवाधिष्टीत शिक्षणाला प्राधान्य देत आहे. आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना उत्तरं द्यायची आहेत. जेंव्हा निर्णय घ्यायची वेळ होती ज्यांच्यावर निर्णय घ्यायची जबाबदारी होती ते काय करत होते.

भारत जगाला लस पुरवतोय

भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. जगातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या