व्ही स्कुल शैक्षणिक अँप साठी पाठ निर्मितीत गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सहभाग
जळगाव -जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वोपा संस्थेच्या मार्फत जिल्हा परिषद शिक्षण विभाग व्ही स्कुल अँप च्या निर्मितीचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध असलेल्या या अँप साठी मुक्ताईनगर तालुक्यातील 24 विषय शिक्षक आणि 15 तंत्रस्नेही यांनी सुमारे 40 व्हिडीओ पाठांची निर्मिती केली आहे. मुक्ताईनगर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन सोबतच प्रत्यक्ष अध्यापन करून व्हिडीओ चित्रीकरण करत योगदान दिले.
इयत्ता पहिली व दुसरी चे काही पाठ गटशिक्षणाधिकारी यांच्या सहभागाने अँप मध्ये समाविष्ट करण्यात आले.प्रत्यक्ष गटशिक्षणाधिकारी अध्यापनात सहभागी झाल्याने शिक्षकांना आनंद झाला. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील केंद्र प्रमुख अनिल पाठक, केंद्र प्रमुख संतोष धनगर, हिरालाल कळसकर, सुनिल बडगुजर,रोशन साळुंखे, अनिल पवार, संदीप बनसोड, आशा वानखेडे, भूपेंद्र दहिवले इत्यादी तंत्र स्नेही शिक्षकांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे.